प्रतिनिधी/ सातारा
सातारा शहरातील शहापूर माध्यमातून पाणी वितरण होणाऱया जकातवाडी जलशुध्दीकरण केंद्र व शहापूर डब्लुटीपी व शहापूर माध्यमातील टक्याचे प्रिर्व्हेटीव व दुरूस्तीचे काम करण्यात येणार आहे. त्यामुळे शनिवार दि. 2 रोजी दुपारपासुन ते रविवार दि. 3 रोजी सकाळपर्यंत या भागातील पाणी पुरवठा होऊ शकणार नाही.
याअंतर्गत शनिवारी सकाळी घोरपडे टाकी माध्यमातून होणारा चार भिंती टाकी ते कूपर कारखाना अखेर असणाऱया डोंगराळ भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. तसेच यशवंत गार्डन टाकी माध्यमातून पाणी वितरण होणाऱया कुंभार वाडा परिसर, सोनार गल्ली परिसर, पोवई नाका भाजी मंडई, पेठ रविवार, पेठ मल्हार काही भाग, पंताचा गोट, तसेच सायंकाळच्या सत्रात पेठ मल्हार शेटे चौक, गुरूवार पेठ काहीभागातील पाणी पुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे.
त्याचबरोबर रविवार दि. 3 रोजी सकाळी शहापूर उध्दव योजनेतून पाणी पुरवठा होणाऱया गुरूवार टाकी, गणेश टाकी, यशवंत टाकी, घोरपडे टाकी, राजवाडा टाकी, बुधवार नाका टाकी या टाक्यांद्वारे वितरीत होणाऱया भागातील पाणी पुरवठा सकाळच्या सत्रात बंद ठेवण्यात येणार आहे. तरी संबंधीत नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे नगरपरिषदेचे पाणीपुरवठा सभापती स्मिता हदगे, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, नगराध्यक्षा माधवी कदम व मुख्याधीकारी अभिजीत बापट यांनी कळविले आहे.