प्रतिनिधी /बेळगाव
श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान बेळगाव शाखेच्यावतीने आयोजित करण्यात येणारी दुर्गामाता दौड यंदा सालाबादप्रमाणे मोठय़ा प्रमाणात साजरी करण्याचा निर्णय रविवारी अनसुरकर गल्ली येथील छत्रेवाडा येथे झालेल्या बैठकीत धारकऱयांनी घेतला. यंदा दुर्गामाता दौड नऊ दिवस भव्य प्रमाणात करण्याचा निर्धार केला.
प्रशासनाने मंदिर, शाळा आणि सिनेमागृह सुरू करण्यासाठी परवानगी दिली आहे. त्याप्रमाणे देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी चाललेल्या दुर्गामाता दौडला आडकाठी न आणता दुर्गामाता दौड भव्य प्रमाणात साजरी करण्यास परवानगी द्यावी, असे विचार धारकऱयांनी बैठकीत मांडले.
कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असल्याने जिल्हा प्रशासन अनेक गोष्टींवरील निर्बंध कमी करून परवानगी देत आहे. गतवषी कोरोनामुळे दुर्गामाता दौड मोठय़ा प्रमाणात झाली नाही. त्यामुळे यंदा दुर्गामाता दौड नऊ दिवस साजरी करण्याबरोबर धार्मिक कार्यक्रम भव्य प्रमाणात करण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी बैठकीत केली.
दरवषीप्रमाणे संभाजी भिडे गुरुजींच्या मार्गदर्शनाखाली यंदाही शहर परिसरात नऊ दिवस दुर्गामाता दौड भक्तिभावाने व भव्य प्रमाणात करण्याचा निश्चय धारकऱयांनी केला. प्रशासन निवडणुकींना परवानगी देत आहे. मात्र धार्मिक कार्यक्रमांसाठी निर्बंध का? असा प्रश्नदेखील धारकऱयांनी बैठकीत उपस्थित केला.
यावेळी जिल्हाध्यक्ष किरण गावडे म्हणाले, बैठकीत धारकऱयांनी केलेल्या सूचना व मागण्यांचा विचार केला जाईल. धारकऱयांना निराश न करता दुर्गामाता दौडसाठी प्रशासनाकडून रितसर परवानगी घेतली जाईल, असे सांगितले. याप्रसंगी शहर कार्यवाह विश्वनाथ पाटील, तालुका कार्यवाह कल्लाप्पा पाटील, शहरप्रमुख अजित जाधव, विभागप्रमुख पुंडलिक चव्हाण, किरण बडवाण्णाचे, चंद्रशेखर चौगुले, शंकरदादा भातकांडे, अनंत चौगुले, विठ्ठल सोमणाचे, युवराज पाटील, ओमकार पुजारी, हिरामणी मुचंडीकर, अशोक पाटील, महेश जांगळे, श्रीधर पाटील, बाळू गुरव यासह सर्व विभागप्रमुख व धारकरी बहुसंख्येने उपस्थित होते.