वार्ताहर/ दाभाळ
अतिसाराची लागण झालेल्या पणसपाणी बेतोडा भागात मंगळवारी आरोग्य खात्याच्या पथकाकडून पाहणी करण्यात आली. गेल्या सहा दिवसापासून या वाडय़ावरील 7 ते 8 लोकांना ताप, उलटय़ा व जुलाबाची बाधा झाल्याने इस्पितळात दाखल करावे लागले होते. त्यासंबंधी वृत्त प्रसिद्ध होताच आरोग्य पथकाने या भागाला भेट दिली.
बेतोडा ग्रामीण उपआरोग्य केंद्राचे अधिकारी भूषण शेटकर व सिंदीया कांदोळकर रुग्ण व त्यांच्या पुटुंबीयांची भेट घेऊन विचारपूस केली. परिसराची पाहणी करून आजाराची नेमकी कारणे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. गावात इतरांना या आजाराची लागण होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून प्रथमोपचाराची औषधे वितरीत करण्यात आली.
पणसपाणी भागातील काही लोकांना ताप, उलटय़ा व जुलाबाची बाधा झाल्याने इस्पितळात दाखल करावे लागले होते. अचानक आलेल्या या साथीमुळे गावात भीतीचे वातावरण पसरले होते. रुग्णांमध्ये लहान मुले तरुण व वृद्धांचाही समावेश होता. आरोग्य पथकाच्या पाहणीत या आजारामागील ठोस कारण सापडले नाही, मात्र या भागात पाणी पुरवठा करणारी सार्वजनिक बांधकाम खात्याची जलवाहिनी मागील एक महिन्यापासून फुटलेल्या अवस्थेत असून ती अद्याप दुरुस्त न केल्याने पाण्यातून हा संसर्ग होऊ शकतो असा प्राथमिक अंदाज आरोग्य खात्याच्या या अधिकाऱयांनी व्यक्त केला आहे. या भागातील लोकांना पाण्याचा व्यवस्थित पुरवठा होत नसल्याने पाणी साठवून ठेवून त्याचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे एखाद्या वेळेस दुषित पाणी पोटात जाऊन हा आजार होऊ शकतो असेही त्यांनी सांगितले. काही कुटुंबानी साठवून ठेवलेल्या पाण्याचे नमूने तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली.