वृत्तसंस्था/ हरारे
येथे सुरू असलेल्या दुसऱया आणि शेवटच्या कसोटीत यजमान झिंबाब्वेने लंकेला विजयासाठी 361 धावांचे आव्हान दिले असून खेळाच्या पाचव्या दिवशी ालंकेने दुसऱया डावात शेवटची बातमी हाती आली त्यावेळी 3 बाद 189 धावा जमविल्या. ही कसोटी अनिर्णित अवस्थेकडे झुकली आहे.
दरम्यान या कसोटीत झिंबाब्वेने पहिल्या डावात 406 धावा जमविल्यानंतर लंकेचा पहिला डाव 293 धावात आटोपला. झिंबाब्वेने 113 धावांची आघाडी मिळविली. झिंबाब्वेने 1 बाद 62 या धावसंख्येवरून पाचव्या दिवसाच्या खेळाला प्रारंभ केला. तत्पूर्वी झिंबाब्वेने आपला दुसरा डाव 7 बाद 247 धावावर घोषिम नयम लकेंला विजयासाठी 361 धावांचे आव्हान दिले. कुशल मेंडीसच्या दमदार नाबाद शतकाने या सामन्यात लंकेचे आव्हान जिवंत राहिले आहे. फर्नांडो आणि मेंडीस यानी दुसऱया गडय़ासाठी 81 धावांची भर घातली. फर्नांडोने 4 चौकारासह 47 धावा जमविल्या. सिकंदर रझाने फर्नांडोला पायचीत केले. मॅथ्युज 13 धावावर बाद झाला. मेंडीसने एका बाजूने चिवट फलंदाजी करत आपले शतक झळकविले. तो 1 षटकार आणि 12 चौकारासह 105 धावावर खेळत आहे. चंडीमल 10 धावावर खेळत आहे. या जोडीने चौथ्या जोडीसाठी अभेद्य 49 धावांची भर घातली आहे. दोन सामन्यांच्या या मालिकेत लंकेने पहिला सामना जिंकून झिंबाब्वेवर 1-0 अशी आघाडी यापूर्वीच घेतली आहे.
संक्षिप्त धावफलक- झिंबाब्वे प डाव 406, लंका प डाव 293, झिंबाब्वे दु डाव 7 बाद 247 डाव घोषित, लंका दु डाव -3 बाद 189, (मेंडीस खेळत आहे. 105, फर्नांडो 47, करूणारत्ने 12, मॅथ्युज 13, चेंडीमल खेळत आहे 10, सिकंदर रझा, मुंबा, नेयुची प्रत्येकी 1 बळी)