वृत्तसंस्था/ ढाक्का
विंडीजचा संघ सध्या बांगलादेशच्या दौऱयावर कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात विंडीजने यजमान बांगलादेशचा पराभव करून आघाडी घेतली आहे. या मालिकेतील येत्या शुक्रवारपासून येथे दुसरी आणि शेवटची कसोटी सुरू होणार आहे. या कसोटीत बांगलादेशचा अष्टपैलू शकीब अल हसन दुखापतीमुळे उपलब्ध होवू शकणार नाही, अशी माहिती बांगलादेश क्रिकेट मंडळातर्फे देण्यात आली.
या मालिकेतील पहिल्या सामन्यात मेयर्सच्या दुसऱया डावातील नाबाद द्विशतकाच्या जोरावर विंडीजने बांगलादेशचा 3 गडय़ांनी पराभव केला होता. पहिल्या कसोटीत खेळताना शकीबला दुखापत झाली होती. या दुखापतीतून तो अद्याप पूर्णपणे बरा झाला नसल्याने त्याला दुसऱया कसोटीत खेळता येणार नाही.