वृत्तसंस्था/ मेलबोर्न
ऍडलेडच्या पहिल्या दिवस-रात्रीच्या कसोटी सामन्यात खेळताना ऑस्ट्रेलियाचा ज्यो बर्न्स जखमी झाला होता. दुसऱया कसोटीसाठी तो उपलब्ध होईल किंवा नाही याबाबत शंका व्यक्त केली जात होती पण बर्न्स या दुखापतीतून आता पूर्णपणे बरा झाला असून दुसऱया कसोटीत तो खेळणार असल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाच्या प्रवक्त्याने सांगितले. मात्र नवोदित पुकोवस्की दुसऱया कसोटीसाठी उपलब्ध होवू शकणार नाही. ऍडलेडच्या पहिल्या कसोटीत बुमराहच्या उसळत्या चेंडूवर बर्न्स जखमी झाला होता. हा वेगवान चेंडू बर्न्सच्या कोपरावर आदळला होता. बर्न्सची ही दुखापत गंभीर नसल्याचे सांगण्यात आले. या मालिकेतील पहिल्या कसोटीत दुखापतीमुळे वगळण्यात आलेल्या वॉर्नरच्या जागी नवोदित पुकोवस्कीला संघात संधी देण्यात आली होती. बॉक्सिंग डे दिवशी या दुसऱया कसोटीला प्रारंभ होणार असून वॉर्नर या सामन्यात खेळणार असल्याचे समजते.