जिल्हाधिकाऱयांनी सौंदत्ती आणि रामदुर्ग तालुक्मयाला दिली भेट
प्रतिनिधी/ बेळगाव
दुसऱया टप्प्यातील निवडणूका दि. 27 डिसेंबर रोजी होत आहेत. त्या निवडणुकीची तयारीही जिल्हा प्रशासनाने सुरू केली आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांनी रामदुर्ग आणि सौदत्ती तालुक्मयातील काही ग्राम पंचायतींना भेटी देवून निवडणुकीच्या तयारीची पाहणी केली.
या निवडणुकीसाठी प्रशिक्षण कार्यकमाचे आयोजन करण्यात आले होते. त्या कार्यक्रमाला भेट देवून जिल्हाधिकाऱयांनी अधिकाऱयांना व कर्मचाऱयांना सूचना केल्या आहेत. निपक्ष व अत्यंत काळजीपूर्वक काम करावे, असे त्यांनी यावेळी सांगितले. निवडणुकीत कोणत्याही प्रकारचा गोंधळ होवू नये यासाठी प्रत्येकाने काळजीपूर्वक काम करावे, असे त्यांनी सांगितले.
सौंदत्ती, रामदुर्ग या तालुक्मयांमध्ये मतदान केंद्र करण्याबाबत सुचना देखील यावेळी करण्यात आल्या. पहिल्या टप्प्यातील निवडणूक मंगळवार दि. 22 रोजी होत आहे. त्याची पूर्व तयारी झाली असून सात तालुक्मयांमध्ये हे मतदान होणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कोणतीही अडचण आली तर वरि÷ अधिकाऱयांशी संपर्क साधून त्यावर तोडगा काढावा, असे त्यांनी सांगितले.