ऍक्सिस बँक चार टक्क्मयांनी नफ्यात : निफ्टी 11,322.50 वर बंद
वृत्तसंस्था / मुंबई
चालू आठवडय़ातील सलग दुसऱया दिवशी जागतिक सकारात्मक कल आणि विदेशी कोषांचा प्रवाहामुळे मंगळवारी एचडीएफसी बँक, एचडीएफसी, आयटीसी तसेच ऍक्सिस बँक समभाग वधारल्याने सेन्सेक्सला 225 अंकांनी तेजी प्राप्त करण्यात यश मिळाले आहे.
बीएसईमधील प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीमुळे सेन्सेक्स 38,556.27 अंकांवर बंद झाला आहे. दिवसअखेर सेन्सेक्स 224.93 अंकांनी वधारुन निर्देशांक 38,407.01 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 52.35 अंकांनी वधारुन त्याचा निर्देशांक 11,322.50 बंद झाल्याचे पहावयास मिळाले आहे.
सेन्सेक्समध्ये ऍक्सिस बँकेचे समभाग सर्वाधिक चार टक्क्मयांनी नफ्यात राहिले असून सोबत इंडसइंड बँक, आयटीसी, एचडीएफसी बँक, टाटा स्टील, एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग तेजीसोबत बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांपैकी टायटन, भारती एअरटेल, एचसीएल टेक आणि ओएनजीसी यांचे समभाग नुकसानीत राहिले आहेत.
विविध शेअर बाजाराचा जागतिक पातळीवरील सकारात्मक कल आणि विदेशी गुंतवणुकीचा सतत राहिलेला प्रभाव हा बाजाराला मजबूत स्थिती देण्यात यशस्वी झाल्याचे शेअर बाजार अभ्यासकांनी म्हटले आहे.
विविध घटनांचा प्रभाव
रशियाने जगात पहिल्यादा कोरोनावर लस शोधून त्याला मान्यता दिल्याच्या बातम्याचा परिणाम हा देशातील शेअर बाजारावर प्रभाव टाकणाऱया ठरल्या आहेत. याच्यापाठोपाठ आंतरराष्ट्रीय पातळीवरील अन्य घटनाही कारणीभूत ठरल्या आहेत. जगात कोविड संसर्गाची संख्या ही दोन कोटीच्या घरात पोहोचली आहे. यामध्ये देशाचा आकडा 22.68 लाखावर पोहोचला असल्याने गुंतवणूकदार बाजाराचा गुंतवणूक करतेवेळी सावध पावित्रा घेत असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.