सेन्सेक्स 14 तर निफ्टी 26 अंकांनी वधारला
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील दुसऱया सत्रात मंगळवारी सेन्सेक्समध्ये तेजीची झुळूक राहिल्याचे पहावयास मिळाले आहे. यामध्ये दिवसअखेर सेन्सेक्स 14 अंकांच्या वाढीसोबत स्थिरावला आहे. एकवेळ सेन्सेक्स 53,000 च्यावर प्रवास करत होता, परंतु नफावसुलीमुळे मोठी तेजी प्राप्त करण्यात बाजाराला अपयश आल्याचे वातावरण राहिले होते.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्सने ट्रेडिंगच्यादरम्यान 53,057.11 अंकांची उच्चांकी पातळी गाठली होती. परंतु नफावसुलीच्या प्रभावामुळे सेन्मसेक्स प्रभावीत झाला होता. दिवसअखेर सेन्सेक्स 14.25 अंकांसह 0.03 टक्क्यांची तेजीची झुळूक नोंदवत निर्देशांक 52,588.71 वर बंद झाला आहे. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 26.25 अंकांनी वधारुन निर्देशांक 15,772.75 वर बंद झाला आहे.
सेन्सेक्सच्या समभागांमध्ये सर्वाधिक 5 टक्क्यांपेक्षा अधिकच्या तेजीत मारुतीचे समभाग राहिले आहेत. सोमवारच्या सत्रात मात्र यामध्ये सर्वाधिक घसरण राहिली होती. यासोबतच लार्सन ऍण्ड टुब्रो, अल्ट्राटेक सिमेंट, टीसीएस, टायटन, टाटा स्टील आणि बजाज ऑटो यांचे समभागही 2.20 टक्क्यांनी चांगली कामगिरी करत बंद झाले आहेत.
दुसऱया बाजूला एशियन पेन्ट्स, बजाज फायनान्स, नेस्ले इंडिया, हिंदुस्थान युनिलिव्हर, इंडसइंड बँक, सन फार्मासह अन्य समभाग 1.91 टक्क्यांनी नुकसानीत राहिले आहेत.
जागतिक पातळीवरील सकारात्मक वातावरणामुळे आणि लसीकरणामधील तेजीच्या संकेतामुळे बाजार मजबूत तेजीसोबत खुला झाला होता. मंगळवारच्या सत्रात समभागात तेजीची गती राहिली आहे, कारण यामध्ये लॉकडाऊनमधील शिथिलेचा परिणाम बाजारावर राहिल्याचे अभ्यासकांचे मत आहे. प्रारंभीच्या काळात बाजारात तेजी राहिली होती. याचे कारण पश्चिमेकडील बाजारात सकारात्मक स्थिती राहिली होती. ही स्थिती निर्माण होण्यास फेडरल रिझर्व्हच्या पतधोरणातील बदलासंदर्भात चिंता राहण्याऐवजी आर्थिक पुनरुद्धाराकडे कल राहिला आहे.
नफा वसुलीमुळे सर्वोच्च टप्पा प्राप्त करणाऱया बाजाराला प्रभावीत व्हावे लागले आहे. आशियातील अन्य बाजारात शांघाय, सोल आणि टोकिओ लाभात राहिले आहेत. तर हाँगकाँग नुकसानीत राहिला आहे. आंतरराष्ट्रीय तेल मानक बेंट क्रूड 0.47 टक्क्यांनी घसरणीसोबत 74.55 डॉलर प्रति बॅरेलवर राहिले आहे.