बेळगाव जिल्हय़ातील 12 जण कोरोनामुक्त, राज्यात मात्र 248 नवे रुग्ण
प्रतिनिधी/ बेळगाव
रोज कोरोनाचा अहवाल किती येतो, याकडे साऱयांचेच लक्ष लागलेले असते. गेल्या दोन दिवसांमध्ये जिल्हय़ात एकही रुग्ण आढळला नाही. यामुळे दिलासा मिळाला आहे. याचबरोबर बारा रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. ही जमेची बाजू आहे. असे असले तरी राज्यात मात्र कोरोनाबाधितांचा आलेख दिवसागणिक वाढत चालला आहे. शुक्रवारी राज्य हेल्थ बुलेटिनने जारी केलेल्या अहवालात 248 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले.
कोरोनाची धास्ती साऱयांनाच लागली आहे. आपल्या जिल्हय़ात किंवा तालुक्मयात किती जण आढळले? याकडे लक्ष लागलेले असते. जिल्हय़ाचा अहवाल तसेच राज्याचा अहवाल किती आहे? हे पाहण्यासाठी धडपड सुरू असते. गेल्या दोन दिवसांपासून बेळगाव जिल्हय़ाला दिलासा मिळत गेला आहे. परराज्यांमधून येणाऱया व्यक्तीलाच कोरोनाची लागण अधिक होत असल्याचे दिसून येत आहे. जिल्हय़ामध्ये आतापर्यंत 139 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे.
मंगळवार दि. 26 रोजी 13 जणांना, त्यानंतर बुधवार दि. 27 रोजी चार जणांना कोरोनाची लागण झाली होती. त्यामुळे पुन्हा भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र सलग दोन दिवस एकही रुग्ण आढळला नाही. यामुळे काहीशी भीती कमी झाली आहे. शुक्रवारी 12 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यामुळे कोरोनाबाधित 106 रुग्ण आतापर्यंत बरे झाले आहेत. ही बाब देखील दिलासादायक आहे. जिल्हय़ामध्ये केवळ एका वृद्धेचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.