सूरत विमानफेरी रद्द : प्रवाशांअभावी फेऱया रद्दचा निर्णय
प्रतिनिधी / बेळगाव
अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे चक्रीवादळाचा दणका दुसऱया दिवशीही विमानसेवेला बसला. चक्रीवादळ मुंबई-गुजरातच्या दिशेने फिरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून सूरत विमानफेरी रद्द करण्याचा निर्णय स्टार एअरने घेतला. यामुळे मागील दोन दिवसांमध्ये प्रवासी संख्येवरही परिणाम झाल्याचे दिसून आले.
बेळगाव विमानतळावरून मिळालेल्या माहितीनुसार ट्रूजेटने सोमवारच्या तिरुपती, हैद्राबाद, कडाप्पा व म्हैसूर या चारही विमानफेऱया रविवारी रात्रीच रद्द केल्या. स्पाईसजेटने हैद्राबाद व मुंबई फेऱया रद्द केल्या. अलायन्स एअरने मागील दीड महिन्यापासून पुणे विमानफेरी बंद ठेवली आहे.
या फेऱया होत्या सुरू
इंडिगोने सोमवारी बेळगाव-हैद्राबाद-बेळगाव व बेंगळूर-बेळगाव-बेंगळूर या दोन विमानफेऱया सुरू ठेवल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. बेळगाव परिसरात सोमवारी सकाळच्या सत्रात ढगाळ वातावरण होते. त्यानंतर मात्र ऊन पडल्याने विमानांचे लँडींग व टेकऑफ करणे सोयीस्कर झाल्याने काही विमानफेऱया सुरू ठेवण्यात आल्या होत्या. परंतु प्रवाशांची संख्या अत्यल्प असल्याने कंपन्यांनी फेऱया रद्द करण्याचा निर्णय घेतला.
रविवारी केवळ 2 शहरांना विमानसेवा
रविवारी चक्रीवादळाचा फटका बसल्याने ढगाळ वातावरण होते. यामुळे विमानांचे लँडींग करण्यास समस्या निर्माण होत असल्याने विमानफेऱया रद्द करण्यात आल्या. जोधपूर व इंदूर या दोन शहरांना विमानांचे उड्डाण झाले. त्यामुळे केवळ 67 प्रवाशांनी रविवारी दिवसभरात बेळगाव विमानतळावरून प्रवास केल्याची माहिती विमानतळ प्राधिकरणाकडून देण्यात आली आहे.