प्रतिनिधी/ बेळगाव
लॉकडाऊननंतर स्मार्ट सिटीच्या कामाला सुरुवात झाली आहे. पहिले रेल्वेगेटजवळ सध्या पाईप घालण्याचे काम सुरू असून त्यातच दुसरीकडे पहिल्या रेल्वेगेटच्या दुरुस्ती काम हाती घेण्यात आली आहे. त्यामुळे पहिले रेल्वेगेट वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहे. परिणामी सर्व वाहतूक दुसऱया गेट जवळून वळविण्यात येत आहे. सर्व वाहतूक दुसऱया रेल्वेगेटजवळ वळविल्याने अनगोळ नाक्मयापासून दुसऱया रेल्वेगेटपर्यंत वाहतुकीची प्रचंड गर्दी होत आहे.
लॉकडाऊनमध्ये दुसरे रेल्वेगेट पूर्णतः बंद करण्यात आले होते. सर्व वाहतूक पहिल्या रेल्वेगेटपासून सुरू होती. मात्र पलीकडच्या रस्त्यावर जायचे असल्यास पूर्ण वळसा घालून जावे लागते. पादचाऱयांना मात्र दुभाजक ओलांडून जाणे शक्मय होते. आता पहिल्या रेल्वेगेटजवळील रस्ता खोदण्यात आला असून मोठय़ा पाईप घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
दुसरीकडे रेल्वे रुळाच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. हे काम रविवारपर्यंत तर नक्कीच चालणार आहे. तोपर्यंत वाहतुकीचा सर्व ताण दुसऱया रेल्वेगेटवर पडणार आहे. वाहनचालक वाहतुकीचे नियम पाळत नसल्याने या कोंडीत भर पडत आहे आणि वाहतूक नियंत्रीत करताना पोलिसांवर ताण येत आहे.