प्रतिनिधी/ बेळगाव
दुसरे रेल्वेगेट येथील रेल्वे फाटकावरील पाईप मंगळवारी सायंकाळी अचानकपणे मोडून कोसळला होता. तांत्रिक बिघाड झाल्याने ही घटना घडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे बुधवारी रेल्वे विभागाच्यावतीने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले होते. यामध्ये निर्माण झालेला दोष निवारणाचे काम युद्धपातळीवर सुरू होते.
दुसरे रेल्वेगेट येथील फाटकाचा लोखंडी पाईप मोडून तो अचानक कोसळल्याची घटना मंगळवारी रात्री 7.30 वा. घडली होती. तिसरे रेल्वेगेट परिसरात एकेरी वाहतूक सुरू असल्याने दुसरे रेल्वेगेट येथे नेहमी वर्दळ असते. पण सायंकाळी गर्दी कमी असल्याने कोणताही अनर्थ घडला नाही. येथील पाईप वारंवार मोडत असल्याचे निदर्शनास आले आहे. बुधवारी सकाळपासून रेल्वे खात्याच्यावतीने रेल्वे फाटकाच्या दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले होते. तांत्रिक बिघाडामुळे रेल्वे फाटक कोसळल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे दुरुस्ती करून रेल्वे फाटकावरील मार्ग खुला करण्यात आला आहे.