सेन्सेक्स 371.44 अंकांनी वधारला : आर्थिक मदतीने उत्साह
वृत्तसंस्था / मुंबई
आर्थिक कंपन्यांची समभागांमध्ये समाधानकारक खरेदी झाल्यामुळे मंगळवारी दुसऱया दिवशीच्या सत्रात मुंबई शेअर बाजारातील सेन्सेक्स तेजीत राहिला आहे. कोरोनाच्या संकटामुळे औद्योगिक व आर्थिक क्षेत्राला संकटातून सावरण्यासाठी केंद्र सरकार विविध टप्प्यांवर वेगवेगळय़ा उपाययोजनांच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य देण्याची घोषणा करत आहे. सोमवारी म्युच्युअल फंड क्षेत्राला दिलासा मिळण्यासाठी रिझर्व्ह बँकेने मदत करण्याची घोषणा केली. यामुळे बाजारात उत्साहाचे वातावरण राहिल्याचे दिसून आले.
सोमवारी आलेल्या तेजीच्या जोरावर शेअर बाजाराने दुसऱया दिवशीच्या सत्रात मंगळवारी तेजी कायम राखली आहे. यात दिवसभर चढउताराचे वातावरण राहिले होते. परंतु अंतिम क्षणी बीएसई सेन्सेक्स 371.44 अंकांनी वधारुन निर्देशांक 32,114.52 वर बंद झाला तर राष्ट्रीय शेअर बाजारचा निफ्टी दिवसअखेर 98.60 अंकांनी वधारुन निर्देशांक 9,380.90 वर बंद झाला. बीएसई सेन्सेक्सचा निर्देशांक 32,199.91 पर्यंत वधारला होता पण नंतर मात्र नफा कमाईच्या कामगिरीमुळे सेन्सेक्स 31,661.34 पर्यंत घसरल्याचे पहावयास मिळाले.
दिग्गज कंपन्यांमध्ये इंडसइंड बँकेचे समभाग सर्वाधिक नफ्यात राहिले आहेत. या बँकेचे समभाग 15 टक्क्मयांपेक्षा अधिक तेजीत राहिले होते तर बजाज फायनान्स, एचडीएफसी, ऍक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, महिंद्रा ऍण्ड महिंद्रा आणि स्टेट बँक यांचे समभाग तेजीत राहिले होते. दुसऱया बाजूला सन फार्मा, नेस्ले इंडिया, एनटीपीसी, एचसीएल टेक आणि बजाज ऑटो यांचे समभाग मात्र घसरले आहेत.
व्यापाऱयांच्या माहितीनुसार आरबीआयने सोमवारी म्युच्युअल फंडसाठी 50 हजार कोटींची आर्थिक मदतीची घोषणा करत म्युच्युअल फंड क्षेत्राला दिलासा दिला आहे. अशा प्रकारची अन्य आर्थिक मदतीची अपेक्षा असल्यानेच हा तेजीचा प्रवास सुरु असल्याचे तज्ञांनी म्हटले आहे.