मुंमुंबई/प्रतिनिधी
केंद्रीय मंत्री नारायण राणे (narayan rane) यांनी पुन्हा एकदा संजय राऊतांवर निशाणा साधला आहे. राणे यांनी “रात्री करायच्या गोष्टी संजय राऊत (sanjay raut) दिवसा करतात असे त्यांचे लिखाण बघून वाटतंय. कारण लिखाण करताना भान नसते असे वाटते.” केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबईत आज पत्रकार परिषद घेत महाविकास आघाडीवर चौफेर टीका करत संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
संजय राऊत म्हणाले आम्ही दिल्लीत (delhi) धडक मारू, पण धडक कशी मारतात हे माहिती नाही वाटतं. दिल्लीला धडक मारायला आले तर डोक राहणार नाही. डोक्याविना संजय राऊत दिसणार आहे. भाजपवर, पंतप्रधान मोदींवर (PM Modi) टीकेचा भडीमार सुरू आहे. तुमची ५६ आमदार आहात. ते मोदींमुळे निवडून आले आहात. संजय राऊतांचा अग्रलेखही वाचला. देशात काही पोटनिवडणुका झाल्या. यामध्ये दादरा नगर हवेलीच्या (dadra nagar haveli) निवडणुकीत एक जागा अपक्ष उमेदवारांनी जिंकली. शिवसेनेनी मात्र आम्ही जिंकलो असा डंका सुरू केला. त्या उमेदवाराची निवडणूक निशाणी मागविली. त्यामध्ये फलंदाज बॅट घेऊन उभा असल्याची निशाणी आहे. दुसऱ्याच्या मुलाचे बारसे करण्याची सवय शिवसेनेला आहे. डेलकर निवडून आल्या. आम्हाला मोठं यश मिळालं आता आम्ही दिल्ली काबीज करणार, असं म्हणतात, अशी टीकाही त्यांनी संजय राऊतांवर केली.