ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशातील कोरोनाच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी वरिष्ठ अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक घेत आहेत. या बैठकीत कोविड-19 आणि लसीकरण मोहिमेशी संबंधित मुद्द्यांचा आढावा घेतला जाईल. बैठकीला कॅबिनेट सचिव, पंतप्रधानांचे प्रधान सचिव, आरोग्य सचिव आणि डॉ. विनोद पॉल उपस्थित राहणार आहेत.