तपास अधिकारी मारेकऱयांच्या मागावर
प्रतिनिधी/ बेळगाव
दोन दिवसांपूर्वी मच्छे येथे दोन महिलांचा भीषण खून करण्यात आला होता. 24 तासानंतरही खुनाचे धागेदोरे सापडले नव्हते. त्यामुळे मारेकऱयांचा शोध घेण्याचे तपास अधिकाऱयांसमोर आव्हान उभे ठाकले होते. सोमवारी सायंकाळी खुनाचे धागेदोरे सापडले आहेत, अशी माहिती मिळाली आहे.
पोलीस आयुक्त डॉ. के. त्यागराजन, उपायुक्त डॉ. विक्रम आमटे यांच्या मार्गदर्शनाखाली बेळगाव ग्रामीणचे पोलीस निरीक्षक सुनीलकुमार नंदेश्वर त्यांच्या सहकाऱयांनी तपास सुरु केला आहे. पाच महिन्यांच्या गर्भवती महिलेसह दोघी मैत्रीनींचा खून कोणी केला? याची पुसटशी माहिती पोलीस दलाला मिळाली आहे.
या माहितीवरुन पोलिसांनी मारेकऱयांचा शोध घेण्याचे काम हाती घेतले आहे. राजश्री रवी बन्नार (वय 21) तिची मैत्रिण रोहिणी गंगाप्पा हुलमनी (वय 32, दोघेही रा. काळेनट्टी, ता.बेळगाव) यांचा लक्ष्मीनगर, मच्छे येथील ब्रम्हलिंग मंदिराजवळ चाकुने सपासप वार करुन खून करणाऱयांची नावे तपास अधिकाऱयांना समजली आहेत.
उपलब्ध माहितीनुसार विशेष पथकातील अधिकारी मारेकऱयांच्या मागावर आहेत. एक दोन दिवसांत त्यांना अटक झाल्यानंतरच यामागे आणखी कोणाचा हात आहे? याचा उलगडा होणार आहे. प्राथमिक माहितीनुसार एक महिला संशयाच्या भोवऱयात अडकली असून सोमवारी रात्री उशीरापर्यंत पोलीस अधिकारी या प्रकरणाच्या तपासात गुंतले होते.
या संबंधी वरि÷ पोलीस अधिकाऱयांशी संपर्क साधला असता दोन महिलांचे मारेकरी कोण? या संबंधीची माहिती मिळाली आहे. त्याची खतरजमा केली जात आहे. लवकरच मारेकऱयांना अटक करण्यात येईल, असा विश्वास अधिकाऱयांनी बोलून दाखविला. मारेकऱयांच्या चौकशीनंतरच दोन्ही महिलांचा खून कशासाठी झाला? याच्या मागे कोणती कारणे आहेत, याचा उलगडा होणार आहे.