सुळेभावी येथे पोलीस बंदोबस्त कायम
प्रतिनिधी /बेळगाव
सुळेभावी येथील दुहेरी खूनप्रकरणी सहा संशयितांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या यांनी शुक्रवारी पत्रकारांना ही माहिती दिली असून त्या संशयितांची कसून चौकशी करण्यात येत आहे. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सुळेभावी येथे पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे.
रणधीर ऊर्फ महेश रामचंद्र मुरारी (वय 26), प्रकाश निंगाप्पा हुंकरी-पाटील (वय 24, दोघेही रा. सुळेभावी) या दोन तरुणांचा गुरुवार दि. 6 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजता भीषण खून करण्यात आला होता. खुनानंतर मारेकऱयांनी पलायन केले होते. रात्री उशिरा पोलीस आयुक्तांसह वरि÷ अधिकाऱयांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली होती.
गुरुवारी मध्यरात्री पोलिसांनी मारेकऱयांचा शोध सुरू केला होता. 6 ते 7 जणांनी हे कृत्य केल्याची माहिती तपास अधिकाऱयांना मिळाली होती. या पार्श्वभूमीवर सुळेभावी व कलखांब परिसरातील सहा संशयितांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी करण्यात येत आहे. खून झालेले तरुण व मारेकरी हे एकेकाळी मित्रच होते.
बेळगाव ग्रामीणचे एसीपी गिरीश, मारिहाळचे पोलीस निरीक्षक महांतेश बस्सापूर, हिरेबागेवाडीचे पोलीस निरीक्षक विजयकुमार सिन्नूर आदींसह वेगवेगळय़ा अधिकाऱयांचा समावेश असलेल्या पथकाने या प्रकरणाचा छडा लावण्याचे काम हाती घेतले आहे. दरम्यान, सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणीनंतर सायंकाळी सुळेभावी येथे दोन्ही मृतदेहांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
पाळत ठेवून काढला काटा
खून झालेला रणधीर ऊर्फ महेश मुरारी याचा काटा काढण्यासाठी मारेकऱयांनी तब्बल तीन दिवस त्याच्या हालचालींवर पाळत ठेवली होती. रणधीर गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता. तो नेहमी आपल्याजवळ हत्यार ठेवायचा. त्याच्यासोबत त्याचे साथीदारही असायचे. तब्बल तीन दिवस त्याच्या हालचालींवर पाळत ठेवून गुरुवारी त्याच्याजवळ कोणतीच शस्त्रs नाहीत, याची खात्री झाल्यानंतर मारेकऱयांनी त्याच्यावर हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे.
दोन पोलीस निलंबित
दुहेरी खूनप्रकरणाच्या पार्श्वभूमीवर मारिहाळ पोलीस स्थानकातील दोन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे. हवालदार बी. एन. बळगण्णावर व आर. एस. तळेवाड यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. स्थानिक माहिती जमविण्यात अपयशी ठरल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.