निर्यात 3 टक्के घटली – एप्रिल-ऑक्टोबर कालावधीत 26 हजार 496.56 टन दूग्धोत्पादनांची आयात
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
ाढाsरोनाच्या कारणास्तव भारतातून होणाऱया दूग्धोत्पादनांच्या निर्यातीवर मोठा परिणाम झाला होता. एप्रिल ते ऑक्टोबर 2020 च्या काळात दुग्धोत्पादनांच्या निर्यातीत 3.2 टक्के इतकी घसरण दिसून आली आहे. सदरची माहिती सरकारने संसदेत नुकतीच दिली आहे.
निर्यातीत आलेल्या घटीच्या नुकसानीतून सावरण्याचा प्रयत्न केला जात आहे. यातून झालेले नुकसान भरून काढण्यासाठी कृषी आणि प्रक्रियायोग्य खाद्यपदार्थ निर्यात विकास प्राधिकरण (एपीइडीए) सोबत सरकार काम करणार आहे. नुकसानीतून बाहेर पडण्यासाठी येणाऱया काळात अनेकविध उपक्रम राबवले जाणार असल्याचे सरकारने म्हटले आहे. निर्यातीला चालना देण्यासाठीही आगामी काळात भर दिला जाणार असल्याचे समजते.
आयातही घटली
दरम्यान निर्यातीत जशी घसरण दिसली तशी दूध व दूधजन्य पदार्थांच्या आयातीतही दिसली आहे. एप्रिल-ऑक्टोबर कालावधीत 26 हजार 496.56 टन दूग्धोत्पादनांची आयात करण्यात आली आहे, ज्याचे मूल्य 805.42 कोटी रुपयांचे सांगितले जाते. यामागच्या वर्षात समान कालावधीत 831.82 कोटी रुपयांची आयात करण्यात आली होती.
कोरोनाकाळात दूध उत्पादक शेतकऱयांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला होता. त्यावेळी सरकारने दूध सहकारी संघाच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकऱयांना किसान क्रेडिट कार्डांचे वितरण केले होते. या मोहिमेंतर्गत 52.46 लाख दूध उत्पादक शेतकऱयांनी फॉर्म भरला होता. 22 जानेवारी 2021 पर्यंत दूधसंबंधीत उपक्रमांसाठी 5.72 लाख नव्या किसान क्रेडिट कार्डांना मंजुरी दिली असून याअंतर्गत 3 हजार 841.74 कोटी रुपये मंजूर करण्यात आले असल्याची माहिती सरकारने दिली.