क्रीडा प्रतिनिधी/ बेळगाव
वेणुग्राम सायकल क्लब बेळगाव, इनरव्हील क्लब बेळगाव, केएलई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने बेळगावात प्रथमच दूथ्लॉन (धावणे व सायकलींग) स्पर्धेचे आयोजन रविवार दि. 10 जानेवारी रोजी केएलई स्पोर्ट्स कॉम्लेक्स येथे करण्यात आले आहे.
सदर स्पर्धा विश्व सायकलिंग स्पर्धेच्या नियमानुसार घेण्यात येणार आहे. प्रत्येक पाईंटला चिपिंग पॉईंटचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा दोन विभागात होणार असून, पहिला विभाग (स्प्रिंट गट) महिला व पुरूष खुला गट सायकल रन- 5 किमी धावणे, 20 किमी सायकलींग व 2.5 किमी धावणे अशी स्पर्धा होणार आहे. दुसरा गट स्टॅंडर्ड महिला, पुरूष खुला गट सायकल रन- 10 किमी धावणे, 40 किमी सायकलींग व 5 कि. मी. पुन्हा धावणे अशी स्पर्धा आहे.
पहिल्या गटासाठी केएलई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स नेहरू नगर येथून धावण्याच्या शर्यतीने सुरू होणार असून पुढे जेएनएमसी महाविद्यालय, निसरंग हॉटेल, सर्व्हिस रोड, कॅन्सर हॉस्पिटल येथून बुडा ऑफिस, राष्ट्रीय महामार्ग, श्रीनगर गार्डन, केपीटीसीएल हॉल, राष्ट्रीय महामार्ग व त्याच मार्गावरून परत केएलई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे सांगता होणार आहे.
स्टॅंडर्ड विभाग दुसऱया गटासाठी केएलई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, जेएनएमसी कॉलेज, निसरंग हॉटेल, सर्व्हीस रोड, राष्ट्रीय महामार्ग, यमनापूर, काकती, होनगा, परत काकती, हिंडाल्को ब्रिज, राष्ट्रीय महामार्ग, केपीटीसीएल हॉल, श्रीनगर गार्डन, निसरंग हॉटेल, जेएनएमसी महाविद्यालय येथून केएलई स्पोर्ट्स कॉम्लेक्स नेहरूनगर येथे सांगता होणार आहे. या दोन्ही गटातील महिला व पुरूष विजेत्यांना अनुक्रमे 3 हजार रूपये, 2 हजार रूपये, 1 हजार रूपये, पदके, प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे स्पर्धा पूर्ण करणाऱया स्पर्धकांना पदके व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे. इच्छुक स्पर्धकांनी केएलई स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स येथे 5 ते 5.30 या वेळेत उपस्थित रहायचे आहे. सकाळी 6 वाजता ध्वज दाखवून स्पर्धेला प्रारंभ होणार आहे.