प्रतिनिधी / सांगली
शासनाने दूध उत्पादकांना वाऱ्यावर सोडले आहे. त्यामुळे दूध दरासाठी १० जून रोजी रयत क्रांती संघटनेतर्फे राज्यभर एल्गार आंदोलन करण्यात येणार आहे अशी माहिती माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी दिली.
या आंदोलनात महाविकास आघाडी सरकारच्या पुतळ्याला दुधाचा अभिषेक आणि चाबूकफोड आंदोलन केले जाणार आहे. राज्यात तेजीच्या काळात दुध उत्पादकांना काही कंपन्या चांगला भाव देतात. परंतू मंदीच्या काळात सध्या शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडले आहे. राज्यातील काही भागात दुधाचे दर १८ ते २० रूपयांपर्यत उतरले आहेत. राज्य शासनाने ३ ते ५ फॅटच्या दुधासाठी २५ रूपये दर ठरवला आहे. परंतू या निर्णयाप्रमाणे भाव मिळत नाही. म्हणून हे आंदोलन केले जाणार आहे.