केएससीए आंतरक्लब क्रिकेट स्पर्धा
बेळगाव : हुबळी येथे सुरू असलेल्या केएससीए ग्रुप एक 19 वर्षाखालील इंटरक्लब क्रिकेट स्पर्धेत दूरवाणी क्रिकेट संघाने यंग लायन्स व बेंगळूर स्पोर्ट्स क्लबचा सलग पराभव केला. बेळगावच्या वेंकटेश शिराळकरने आक्रमक खेळाचे प्रदर्शन करत शतक झळकविले. त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
दूरवाणी संघाने प्रथम फलंदाजी करताना 50 षटकात 6 गडी बाद 388 धावांचा डोंगर उभा केला. वेंकटेश शिराळकरने 6 षटकार व 19 चौकारासह 122 चेंडूत 176 धावा करून शतक झळकविले. त्याला उत्तर देताना बेंगळूर स्पोर्ट्स क्लबने 50 षटकात 8 गडी बाद 225 धावाच केल्या. दुसऱया सामन्यात यंग लायन्स क्लबने प्रथम फलंदाजी करताना 34.5 षटकात सर्व गडी बाद 154 धावा केल्या. त्याला उत्तर देताना दूरवाणी संघाने 24 षटकात 3 गडी बाद 157 धावा केल्या.