ऑनलाईन टीम / नांदेड :
निवडणूक आयोगाने देशातील 3 लोकसभा मतदारसंघ तसेच राज्यातील 30 विधानसभा मतदारसंघामध्ये पोटनिवडणूक जाहीर केली आहे. यामध्ये नांदेड जिह्यातील देगलूर मतदारसंघाचा समावेश आहे. काँग्रेसचे आमदार रावसाहेब अंतापूरकर यांचे करोनामुळे निधन झाल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती. त्या जागेसाठी पोटनिवणूक जाहीर झाली असून, 30 ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे.
दरम्यान, या निवडणुकीसाठी या निवडणुकीसाठी 8 ऑक्टोबरपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत आहे. 11 ऑक्टोबरपर्यंत अर्जांची छाननी तर 13 ऑक्टोबरपर्यंत अर्ज मागे घेण्याची मुदत असणार आहे. 30 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून, 2 नोव्हेंबरला मतमोजणी होईल.