महिला किरकोळ जखमी.
प्रतिनिधी /वाळपई
शुक्रवारी संध्याकाळ 6 वा.सुमारास सत्तरी तालुक्मयातील देरोडे या ठिकाणी सखाराम लाडको जाधव यांच्या घरावर वीज पडून सामानाची नुकसानी झाली. त्याचप्रमाणे एक महिला किरकोळ जखमी होण्याचा प्रकार घडला .ही घटना शुक्रवारी संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास घडली.
दुपारी पाच वाजल्यापासून आभाळामध्ये गडगडात सुरू होत होता.सत्तरी तालुक्मयातील देऱडे या ठिकाणी सखाराम लाडको जाधव यांच्या घरावर अचानकपणे वीज पडून घराची नुकसानी झाली. मात्र कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. सखाराम लाडको जाधव यांच्या घराशेजारी असलेल्या एका महिलेला काही प्रमाणात दुखापत होण्याचा प्रकार घडला.