युथ फोरम, ‘वुई फॉर यू’चा संयुक्त उपक्रम
पक्ष्यांसाठी पाणी, अन्नाची सुविधा
वार्ताहर / देवगड:
युथ फोरम देवगड आणि ‘वुई फॉर यू’ या संघटनांच्या संयुक्त विद्यमाने देवगड व मिठमुंबरी येथील समुद्र किनाऱयावर ‘इसेन्शियल ड्रॉप’ हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा शुभारंभ नगराध्यक्षा प्रियांका साळसकर यांच्या हस्ते करण्यात आला.
यावेळी युथ फोरमचे अध्यक्ष सिद्धेश माणगावकर, ‘वु फॉर यू’चे अध्यक्ष ऍड. संकेत नेवगी, युथ फोरमचे उपाध्यक्ष प्रणव नलावडे, सचिव अमित पारकर, खजिनदार सागर गावकर, सहसचिव रसिका सारंग, शहर अध्यक्ष सोहम पारकर, संघटक अपेक्षा सकपाळ, कार्यकारी सदस्य ओंकार सारंग, ‘वुई फॉर यू’च्या उपाध्यक्षा संपदा तुळसकर, सचिव ऍड. स्वप्नील कोरगावकर, खजिनदार मिहीर मोंडकर, सदस्या श्रद्धा राऊळ, सायली चव्हाण यांच्यासह युथ फोरम व ‘वुई फॉर यू’चे सभासद व स्वयंसेवक उपस्थित होते.
दोन महिने उपक्रम
आपल्या परिसराची स्वच्छता करण्यासोबतच तेथील रिकाम्या प्लास्टिक बॉटल्सचा पुनर्वापर करून तीव्र उन्हाळय़ात पक्ष्यांसाठी अन्न व पाण्याची सोय करणे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. घरातील टाकाऊ प्लास्टिकच्या बाटल्या व समुद्रावरील कचऱयात पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या यांचा वापर करून समुद्रावरील सुरुच्या झाडांना त्या बांधून त्यात पक्ष्यांसाठी धान्य व पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. पुढील दोन महिने म्हणजे एप्रिल आणि मे युथ फोरमच्या माध्यमातून हा उपक्रम सुरू राहणार आहे. जेणेकरून या वाढत्या उन्हात पक्ष्यांना एक निवारा मिळेल, ज्यांना शक्य आहे त्यांनी प्लास्टिक बॉटलमध्ये पाणी भरावे. निसर्गाचे संगोपन करण्यासाठी आपण खारीचा वाटा उचलूया, असे युथ फोरमचे अध्यक्ष सिद्धेश माणगावकर आणि ‘वुई फॉर यू’ चे अध्यक्ष ऍड. संकेत नेवगी यांनी सांगितले. यावेळी मिठमुंबरी बीचची साफसफाई करण्यात आली.
देवगडमधील महिला तृप्ती पारकर, साक्षी महाडिक, अनुश्री पारकर, प्रिया नलावडे, त्याचप्रमाणे मिठबाव ग्रामपंचायत सदस्य पूनम मयेकर, देवगडमधील युवक सायली जाधव, भावना कुलकर्णी, श्रेयान बांदिवडेकर, हर्षल भुजबळ यांनीही उपस्थिती दर्शविली.