स्वराध्या फाऊंडेशन आयोजित बालनाटय़ स्पर्धा
प्रतिनिधी / मालवण:
मँग्रोव्ह फाऊंडेशन, इको फोक्स व्हेंचर्स आणि स्वराध्या फाऊंडेशन आयोजित जिल्हास्तरीय माध्यमिक आंतरशालेय ग्रीन थिएटर फेस्टिव्हल तथा बालनाटय़ स्पर्धा 2020 मध्ये देवगड येथील शेठ म. ग. हायस्कूलची ‘रुसते आहे’ या बालनाटय़ाने प्रथम तर टोपीवाला हायस्कूलच्या ‘कांदळवन छे नंदनवन’ने द्वितीय तर जय गणेश इंग्लिश स्कूलच्या ‘तुम्ही हो बंधू सखा तुम्ही’ या नाटय़ाने तृतीय क्रमांक पटकाविला.
येथील मामा वरेरकर नाटय़गृहात ही स्पर्धा रविवारी झाली. स्पर्धेचे उद्घाटन पक्षीमित्र चंद्रवदन कुडाळकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी लायन्स क्लब अध्यक्ष उदय घाटवळ, परेश पिंपळे, सुशांत पवार उपस्थित होते. पारितोषिक वितरण अभिनेते संजय मोने यांच्या हस्ते करण्यात आले. परीक्षक म्हणून क्षितिज झावरे, रुपेश नेवगी यांनी काम पाहिले.
स्पर्धेचा अंतिम निकाल पुढीलप्रमाणे– तांत्रिक अंगे – प्रथम : कांदळवन छे नंदनवन (टोपीवाला हायस्कूल). द्वितीय : तुम्ही हो बंधू सखा तुम्ही (जय गणेश, मालवण). तृतीय : कांदळवन एक नंदनवन (मारुती विद्यामंदिर, कणकवली). उत्कृष्ट अभिनय मुली – प्रथम : अनुष्का पोफळे, भूमिका – सॅम, रुसते आहे, शेठ म. ग., देवगड). द्वितीय : सांची साटम (समूह, जिथे सागरा धरणी मिळते, शिरगाव हायस्कूल). तृतीय : भूमिका यादव (आई, कांदळवन वाचव, रोझरी हायस्कूल, मालवण). उत्कृष्ट अभिनय मुले – प्रथम : शौरीन देसाई (रिपोर्टर, भारुड गाणारा, रुसते आहे, शेठ. म. ग. देवगड). द्वितीय : चंदन धुरी (खेकडा, तुम्ही हो बंधू, सखा तुम्ही, जय गणेश, मालवण). तृतीय : रवींद्र पाटकर (तिवर वृक्ष, कांदळवन, छे नंदनवन, टोपीवाला हायस्कूल). लेखन – प्रथम : सोनल उतेकर (रुसते आहे, शेठ. म. ग. देवगड), द्वितीय : लक्ष्मण वसंत वळंजू (कांदळवन, छे नंदनवन, टोपीवाला हायस्कूल). तृतीय : राजेंद्र चव्हाण (जिथे सागरा धरणी मिळते, शिरगाव हायस्कूल, शिरगाव). दिग्दर्शन – प्रथम : सोनल उतेकर (रुसते आहे, शेठ. म. ग. हायस्कूल, देवगड). द्वितीय : ज्योती तोरसकर (कांदळवन, छे नंदनवन, टोपीवाला हायस्कूल, मालवण), तृतीय : डॉ. राजेंद्र चव्हाण (जिथे सागरा धरणी मिळते, शिरगाव हायस्कूल).
संहिता– प्रथम : रुसते आहे (शेठ म. ग. हायस्कूल, देवगड), द्वितीय : कांदळवन, छे नंदनवन (टोपीवाला हायस्कूल), तृतीय : तुम्ही हो बंधू सखा तुम्ही (जय गणेश स्कूल, मालवण). उत्तेजनार्थ – जिथे सागरा धरणी मिळते (शिरगाव हायस्कूल, देवगड), लक्षवेधी– कांदळवन वाचवा (रोझरी इंग्लिश स्कूल).