पंचगंगा नदी घाटावरील घटना, सोलापूरातील तरुणाचा कोल्हापूरात मृत्यू
प्रतिनिधी/कोल्हापूर
देवदर्शनासाठी सोलापूरहून कोल्हापूरला आलेल्या तरुणाचा पंचगंगा नदीमध्ये बुडून मृत्यू झाला. केशव नंदकुमार अलकुंटे (वय 18 रा. बुधवार पेठ, सोलापूर) असे तरुणाचे नांव आहे. शुक्रवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पंचगंगा नदी घाटावर ही घटना घडली. या घटनेची नोंद करवीर पोलीस ठाण्यात झाली. दरम्यान अग्नीशमन दलाच्या जवानांनी शोध मोहिम राबवुन दुपारी 11 वाजण्याच्या त्याचा मृतदेह मिळून आला. शवविच्छेदन करुन मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.