मालवण :
देवबाग येथील मूळ रहिवासी पूजा विश्वंभर मणचेकर हिने चार्टर्ड अकाऊंटंट परीक्षेत यश मिळवले आहे. पूजा मणचेकर मुंबईतील भांडुप येथे वास्तव्यास आहे. तिचे आतापर्यंतचे सर्व शिक्षण मुंबईतच झाले. मुलुंड येथील कॉलेज ॲाफ कॉमर्समध्ये तिने बी. कॉमची पदवी मिळवली. त्यानंतर ‘दी इन्स्टिट्युट ॲाफ चार्टर्ड अकाऊंटंटस् ॲाफ इंडिया’ येथून तिने सीए पदवी परीक्षा उत्तीर्ण केलीय. तिच्या यशाबद्दल सर्वत्र तिचे कौतुक होत आहे.