अमेरिकेच्या मॅसाच्युसेट्स येथून एक हैराण करणारी घटना समोर आली आहे. येथील एका व्यक्तीला एका विशालकाय देवमाशाने गिळले होते. सुमारे 40 सेकंदांपर्यंत हा व्यक्ती देवमाशाच्या जबडय़ात राहिला, पण त्यानंतर देवमाशाने त्याला बाहेर टाकले आहे.
मायकल पॅकर्ड 56 वर्षांचे असून ते मागील 40 वर्षांपासून लॉबस्टर ड्रायव्हरचे काम करत आहेत. समुद्रात ते विविध प्रकारच्या प्राण्यांना पकडून त्यांनतर त्यांची विक्री करतात. शुक्रवारी सकाळी ते हेरिंग कोव बीच येथील समुद्रात सुमारे 35 फूट खोलीवर होते.
सर्वप्रथम मला मोठा धक्का बसला. त्यानंतर सर्वकाही काळे काळे दिसू लागले. मी हालचाल करत होते, तसेच देवमासा स्वतःच्या तोंडाने पूर्ण जोर लावत होता. कुठलीच ईजा झालेली नसल्याचे जाणवताच देवमाशाच्या तोंडातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागलो. 40 सेकंदातच देवमाशाने मला तोंडाबाहेर काढल्याचे पॅकर्ड यांनी सांगितले आहे. देवमाशाच्या जबडय़ातून बाहेर आल्याचा प्रथम मलाच विश्वास बसत नव्हता. मित्रांनी मला समुद्राबाहेर काढून रुग्णालयात दाखल केल्याची माहिती त्यांनी दिली आहे.