वार्ताहर/ ताम्हाणे
देवरुख शहराप्रमाणे संगमेश्वर तालुक्यात मोठय़ा प्रमाणात नाटय़रसिक आहेत. या रसिकांना हक्काने नाटक पाहण्यासाठी सुसज्ज नाटय़गृह नाही. शिवाय स्थानिक हौशी-व्यावसायिक कलावंतांना कला सादर करण्याचे हक्काचे व्यासपीठ नाही. नाटय़रसिक व कलावंतांची ही मागणी लक्षात घेऊन राष्ट्रवादी सांस्कृतिक विभागाचे रत्नागिरी जिल्हाध्यक्ष आसित रेडिज यांनी आमदार शेखर निकम यांच्याकडे या बाबत निवेदन सादर केले.
या निवेदनात त्यांनी तांत्रिक बाबीनी सुसज्ज नाटय़गृह आवश्यक आहे. यातून मार्ग काढून शहरात नाटय़गृह उभारावे, अशी मागणी केली आहे. यावेळी युवक तालुकाध्यक्ष पंकज पुसाळकर, प्रफुल्ल भुवड, नितीन भोसले, हनिफ हरचिरकर, बाळू ढवळे, उल्हास नलावडे आदी उपस्थित होते.