संगमेश्वर / प्रतिनिधी
देवरुख कोल्हापूर मार्गावरील संगमेश्वर ते साखरपा दरम्यानचे साईडपट्यावर वाढलेले गवत हटविण्यास सुरुवात झाली आहे.
संगमेश्वर ते कोल्हापूर मार्गावर संगमेश्वर ते साखरपा मार्गावर मोठे गवत वाढलेले होते. मोठ्या प्रमाणात वाढलेल्या गवतामुळे हा मार्ग घोकादायक बनला आहे. त्यामुळे त्वरित गवत व झुडपे हटविण्यास यावीत अशी मागणी होत होती.
या मार्गाचे काम पूर्ण झाले असून दुसऱ्या टप्प्यातील डाम्बरी करणाला सुरुवात झाली आहे संगमेश्वर पट्ट्यातील काम सुरुवातीला हाती घेण्यात आल्यानंतर ते काम पुढे गेले आहे. मात्र साईडपट्या धोकादायक बनल्या होत्या. त्यामुळे हे काम त्वरीत हाती घेऊन करण्यात यावे अशी मागणी होती. संगमेश्वर पट्यातील हे काम त्वरित हाती घेण्यात आल्याने समाधान व्यक्त होत आहे.
फोटो ओळी – देवरुख मार्गाच्या साईडपट्या वरील झुडपे हटविताना ठेकेदाराची माणसे