3 लाखाचा मुद्देमाल हस्तगत, उत्पादन शुल्कची कारवाई
प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर सर्वत्र लॉकडाऊन असल्याने तळीरामांची तगमग होऊ लागली आहे. मद्याची दुकाने बंद असल्याने मद्यपीची पावले ‘गावठी’कडे वळू लागली आहेत. त्यामुळे प्रशासनाने आता हातभटय़ांकडे मोर्चा वळवला असून संगमेश्वर तालुक्यातील देवरूख व रत्नागिरी शहरातील मच्छिमार्केट, हातखंबा येथे उत्पादन शुल्क विभागाकडून हातभट्टीच्या दारूवर कारवाई करण्यात आल़ी यावेळी सुमारे 3 लाखाचा मुद्देमाल जप्त करत रसायनाची विल्हेवाट लावण्यात आल़ी
कारोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर जिह्यात लॉकडाऊन असून संचार बंदी लागू करण्यात आली आह़े दारू दुकाने बंद असल्याने बेचैन झालेल्या अनेकांनी गावठी हातभट्टीच्या अड्डयावर गर्दी करण्यास सुरूवात केली आहे. या घटनेची दखल घेवून राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून गुरूवारी धडक कारवाई करण्यात आल़ी
विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार देवरूख परशुरामवाडी येथील जंगलमय भागात गावठी दारूची हातभट्टी असल्याची माहिती मिळाली होत़ी या माहितीच्या आधारे गुरूवारी उत्पादन शुल्कच्या भरारी पथकाचे निरिक्षक शरद जाधव यांच्या नेतृत्वाखालील पथकाने या ठिकाणी धाड टाकल़ी यावेळी सुमारे 3 हजार लिटर हातभट्टीच्या दारूचा साठी आढळून आल़ा तर त्याच ठिकाणी काही अंतरावर 1 हजार लिटर गावठी दारू साठा विभागाच्या कर्मचाऱयांना मिळून आल़ा याठिकाणचा एकूण 3 लाख रूपयांचा मुद्देमाल विभागाच्या कर्मचाऱयांकडून जप्त करण्यात आल़ा तर दारूसाठी लागणारी ससायनांची त्याच ठिकाणी विल्हेवाट लावण्यात आल़ी
रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा येथे देखील विभागाच्या कर्मचाऱयांनी गावठी हातभट्टीवर धाड टाकून कारवाई केल़ी यावेळी 600 रूपयांची गावठी हातभट्टीची दारू शुल्ककडून जप्त करण्यात आल़ी तर रत्नागिरी शहरातील मच्छिमार्केट सुर्वेवाडी येथील घरामध्ये अवैध गावठी दारू पोलिसांना आढळून आल़ी तसेच शहरालगतच्या झाडगाव येथील संजय झाडगांवकर यांच्या घराशेजारी असलेल्या मोकळ्या जागेमध्ये सुमारे 7 हजार किमतीचा अवैध दारू साठी शुल्कच्या पथकाला आढळून आल़ा यातील आरोपी फरार झाला आहे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया करण्यात आली आह़े
सदरची कारवाई राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक रत्नागिरीचे निरिक्षक शरद जाधव, दुय्यम निरिक्षक किरण पाटील, जवान विशाल विचारे, सागर पवार आदींनी कारवाई केल़ी