विश्व हिंदू परिषदेचा उपक्रम
ओटवणे / प्रतिनिधी-
निराधार, असहाय्य व गरजू लोकांना मदत करण्याच्या उद्देश्याने देवसु आणि वेर्ले गावातील निराधार व अनाथांसह उत्पन्नाचे कोणतेही साधन नसलेल्यांना विश्व हिंदू परिषद आणि प्रखंड सावंतवाडी यांच्या माध्यमातून आणि सावंतवाडी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी जयंत जावडेकर यांच्या सौजन्याने या अन्न धान्य व जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.
यावेळी विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड मंत्री लक्ष्मीकांत कराड, विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते सुनील सावंत, गौरव शंकरदास, अभियंता मधुकर शिरसाट आणि विश्व हिंदू परिषदेचे वेर्ले आणि देवसु या गावातील कार्यकर्ते उपस्थित होते.