श्री मल्लिकार्जुन देवाचा पालखी उत्सव उत्साहात
प्रतिनिधी /काणकोण
श्रीस्थळ येथील श्री मल्लिकार्जुन देवाच्या पालखीचे वांगडी, महाजन, सेवेकरी, कुळावी आणि अन्य भाविकांच्या लव्याजम्यासहित 2 रोजी सकाळी 7.45 वा. राजबाग येथील देवावेळ किनाऱयावर आगमन झाले. त्यापूर्वी पारंपरिक स्थळी श्रींची सुवासिनींकडून उत्साहात ओवाळणी आणि पूजन झाले. त्यानंतर पालखीत बसलेल्या श्रींच्या मूर्तीला समुद्रस्नानासाठी आणले गेले. यावेळी परंपरेनुसार समदाला केळी, नारळ अर्पण करून समुद्रदेवाचे आभार मानण्यात आले. वर्षातून एकदाच हेणाऱया या उत्सवासाठी देवावेळ किनाऱयावर भाविकांनी एकच गर्दी केली होती. मागची दोन वर्षे कोरोना महामारीमुळे या उत्सवावर जे निर्बंध आले होते त्याची पूर्ण कसर यावर्षी भाविकांनी भरून काढली. यामध्ये स्थानिक भाविकांबरोबर देशी-विदेशी पर्यटकांनी उपस्थिती लावून या उत्सवाचा आनंद घेतला.