ऑनलाईन टीम / मुंबई :
राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मंगळवारी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी तब्बल 125 तासांच्या या स्टिंग ऑपरेशनमधील महत्त्वाचा भाग 29 वेगवेगळय़ा पेनड्राईव्हच्या माध्यमांतून सभागृहात सादर केला. खोटे कुंभाड रचून भाजपच्या 28 लोकांवर कसा एफआयआर दाखल करण्यात आला, याचा संपूर्ण लेखाजोखा यामध्ये आहे. याशिवाय, पडद्याआडून कोणते मोठे नेते कसे खेळ करीत आहेत, हेही या स्टिंग ऑपरेशनमधून स्पष्ट होत आहे. फडणवीसांच्या या स्टिंग बाँम्बनंतर भाजप नेते अतुल भातखळकर यांनी आज सकाळी एक सूचक ट्विट केले आहे.
भातखळकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, ”देवेंद्र आहेत ते…. तळपती तलवार आहेत. भ्रष्टाचाऱ्यांनो तुमचा लवकरच बाजार उठवणार आहेत.”
दरम्यान, महाविकास आघाडीचे नेते एका सरकारी वकिलाच्या माध्यमातून भाजपाच्या नेत्यांवर सूड उगविण्याचे कसे षडयंत्र रचत आहेत. साक्षीदारापासून ते पुराव्यांपर्यंत कसे मॅनेज केले जाते आहे, याचा संपूर्ण लेखाजोखाच स्टिंग ऑपरेशनच्या माध्यमातून फडणवीस यांनी सादर केला आहे. हा एक स्फोटक पुरावा मानला जातो. फडणवीस सभागृहात बोलत होते, तेव्हा विधानसभेत महाविकास आघाडीचे सदस्य चिडीचूप होते.