ई-रोटरी क्लबतर्फे आयोजन
वार्ताहर /सांबरा
शिंदोळी (ता. बेळगाव) येथील देवेंद्र जिनगौडा इंग्रजी माध्यम हायस्कूलमध्ये ई रोटरी क्लब बेळगाव यांच्या सहकार्याने ‘सेव्ह लाईफ बेसीक लाईफ सपोर्ट’ या उपक्रमांतर्गत प्रथमोपचाराबाबत डॉ. प्रकाश फडणीस यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. आपण एखाद्याचा जीव कसा वाचवू शकतो? आणि वेळेत कोणकोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत, याची प्रात्यक्षिकासह सविस्तर माहिती देण्यात आली.
आजच्या या धावपळीच्या युगामध्ये बऱयाचजणांना हृदयविकारासारख्या आजारांना सामोरे जावे लागते. अशावेळी कोणते उपचार केले पाहिजेत, याची माहिती असणे गरजेचे असून ती इतरांपर्यंत व्यवस्थित पोहोचवण्याचे कार्य आपण केले पाहिजे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
यावेळी रोटरी क्लबचे अध्यक्ष अनंत नाडगौडा, डॉ. सोनाली पावले, मुख्याध्यापिका विजयलक्ष्मी पाटील, उपमुख्याध्यापिका रोशनी रोड्रिक्स, कॉलेजचे प्राचार्य काशीनाथ श्रृंगेरी व शिक्षकवर्ग उपस्थित होता. स्वागत संस्थेचे सेपेटरी कुंतूसागर हरदी यांनी केले तर आभार शिक्षिका लक्ष्मी करीकल यांनी मानले.