प्रतिनिधी / सांगली
महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर दि. २९ जूलै २०२१ रोजी सांगली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.
गुरुवार दिनांक 29 जुलै 2021 रोजी सकाळी 9.30 वा वाळवा, ता-वाळवा येथे आगमन व पुरग्रस्त भागाची पाहणी करतील. यानंतर सकाळी 10 वा. मोटारीने अंकलखोप ता. पलूसकडे प्रयाण करतील. सकाळी 10.15 पुरग्रस्त भागाची पाहणी, सकाळी 10.45 वा. मोटारीने भिलवडी ता-पलूसकडे प्रयाण सकाळी 11.10 भिलवडी येथे आगमन व पुरग्रस्त भागाची पाहणी. सकाळी 11.45 वा. मोटारीने ढवळी ता. मिरजकडे प्रयाण. दुपारी 1 वा. ढवळी येथे आगमन व पूरग्रस्त भागाची पाहणी. दुपारी 1.15 वा. मोटारीने सांगलीकडे प्रयाण, दुपारी 2 वा. सांगली येथे आगमन व पुरग्रस्त भागाची पाहणी. दुपारी 5 वा. मोटारीने शिरोळ जिल्हा – कोल्हापूरकडे प्रयाण होईल.