ऑनलाईन टीम / नागपूर :
भाजपच्या ज्येष्ठ नेत्या शोभाताई फडणवीस यांचे सुपुत्र आणि विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे चुलत बंधू अभिजीत फडणवीस यांचे आज सकाळी 9.30 वाजता हार्ट अटॅकने निधन झाले. नागपुरात वयाच्या 54 व्या वषी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
अभिजित फडणवीस हे जगदंबा राईस मिलचे भागीदार होते. सध्या नागपुरात वास्तव्याला होते. मागील काही काळापासून ते आजारी होते. अभिजीत फडणवीस यांच्यावर आज नागपुरात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. त्यांच्या पश्चात मातोश्री, पत्नी, पुत्र तन्मय फडणवीस असा परिवार आहे.