ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली असून त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांना 24 ऑक्टोबर रोजी कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वतः ट्विट करत याबाबत माहिती दिली.
त्यानंतर आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले की, आज रुग्णालयातून मी घरी परतलो आहे. सेंट जॉर्ज रुग्णालयातील सर्व डॉक्टर्स, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी आणि इतरही सर्व कर्मचारी वृंद यांचा, त्यांनी केलेले सहाय्य, घेतलेली काळजी, उपचार यासाठी मी अत्यंत आभारी आहे. तसेच मला लवकर बरे वाटावे, यासाठी ज्यांनी सदिच्छा दिल्या, त्यांचे अनंत आभारही त्यांनी यावेळी मानले.
पुढे ते म्हणाले, डॉक्टरांनी दिलेल्या सल्ल्यानुसार पुढचे सात दिवस मी ‘होम आयसोलेशन‘मध्ये राहणार आहे, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.