ऑनलाईन टीम / मुंबई :
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे ज्येष्ठ आहेत. पण श्रेष्ठ नाहीत. त्यांच्यापेक्षा प्रगल्भ नेतृत्त्व देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे. शरद पवारांना त्यांच्यापेक्षा कोणी पुढे जाता कामा नये, असे वाटते. पण असे 10-20 पवार देवेंद्र फडणवीस खिशात घालून फिरतात, असा घाणाघात भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला.
गोवा विधानसभेतील विजयाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत देवेंद्र फडणवीस यांचे जंगी स्वागत केल्यानंतर गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर निशाणा साधला. पडळकर म्हणाले, शरद पवार हे ज्येष्ठ आहेत. पण श्रेष्ठ नाहीत.त्यांचा विषय असा आहे की, काहीही केले, तर मीच केले म्हणतात. माझ्यापेक्षा कोण पुढे जाता कामा नये, अशी त्यांची वृत्ती आहे. पण देवेंद्र फडणवीस असे 10-20 पवार खिशात घालून फिरतात. त्यांच्यापेक्षा कितीतरी प्रगल्भ नेतृत्व फडणवीस यांच्याकडे आहे. शरद पवारांकडे फक्त विश्वासघातकीपणा, गद्दारीपणा, लबाडीपणा आणि राष्ट्राच्या विरोधातील भूमिका घेण्याचे कौशल्य आहे. हे विषय सोडून त्याच्या पुढचे नेतृत्त्व करण्याची ताकद फडणवीस यांच्यात आहे.