बेंगळूर / प्रतिनिधी
माजी पंतप्रधान एचडी देवेगौडा यांचे नातू सूरज रेवन्ना हे राज्यातील 10 डिसेंबर रोजी होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुका लढवण्याची शक्यता असल्याने कर्नाटकमधील JD(S) कार्यकर्त्यांमध्ये खळबळ उडाली आहे. गौडा कुटुंबीय सूरजला उमेदवारी देण्यासाठी हसन या मतदारसंघातुन तिकीट देण्याचा गंभीरपणे विचार करत असल्याचे सांगितले जाते. डॉक्टर असलेला सूरज देवेगौडांचे मूळ गाव असलेल्या हसन जिल्ह्यात राजकारणात सक्रिय आहे. गेल्या निवडणुकीत हसन विधानसभा मतदारसंघ जिंकून भाजपने जेडीएसला मोठा धक्का दिला. भाजपचे आमदार प्रीतम गौडा हे हसनमधील ताकदवान देवेगौडा कुटुंबाला आव्हान देत आहे.
सूरज हा एच.डी. देवेगौडा यांचा मोठा मुलगा माजी मंत्री एचडी रेवन्ना यांचा दुसरा मुलगा असुन सूरजचा मोठा भाऊ प्रज्वल रेवन्ना हा हसन मतदारसंघातून खासदार आहे. तसेच गेल्या विधानसभा निवडणुकीत वडिलांचा विजय सुनिश्चित करण्यासाठी सूरजने प्रचारात महत्त्वाची भूमिका बजावली असल्याचे त्यांचे समर्थक स्पष्ट सांगतात. एक राखीव व्यक्ती म्हणून ओळखला जाणारा सूरज नेहमी पक्ष कार्यकर्त्यांसोबत दिसतो.
सूरजने आपला राजकीय कारकीर्द हसन जिल्ह्यापुरती मर्यादित ठेवली आहे. जेडीएसचे प्रदेशाध्यक्ष एच. कुमारस्वामी म्हणाले की, सूरज शिवाय पक्ष अनेक उमेदवारांचा विचार करत असुन फक्त अंतिम निर्णय घेणे बाकी आहे. तथापि, सूरजचे काका आणि माजी मुख्यमंत्री एचडी कुमारस्वामी यांनी सांगितले की, अद्याप सूरज किंवा इतर कोणत्याही उमेदवाराला उभे करण्याचा निर्णय घेण्यात आलेला नाही.