बेंगळूर : निजद वरिष्ठ नेते आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा व त्यांच्या पत्नी चेन्नम्मा यांना कोरोनाची लागण झाली आहे. याबाबत देवेगौडा यांनी स्वतः ट्वीट केले आहे. काही दिवसांपासून आपल्या संपर्कात आलेल्यांनी कोविड चाचणी करून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी भीती बाळगण्याची आवश्यकता नाही, असे त्यांनी सांगितले आहे. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देवेगौडा यांना फोन करून त्यांच्या आरोग्याविषयी विचारपूस केली. तसेच ते लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना केली. देशातील कोणत्याही ठिकाणी कोणत्याही इस्पितळात उपचाराची व्यवस्था करण्यात येईल, असेही पंतप्रधानांनी देवेगौडा यांना सांगितले. यावर देवेगौडा यांनी बेंगळूरमध्येच उपचार घेणार असल्याचे सांगितले. त्याचप्रमाणे आरोग्यमंत्री डॉ. के. सुधाकर, विधानसभा विरोधी पक्षनेते सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डॉ. अश्वथ नारायण, लक्ष्मण सवदी यांच्यासह अनेकांनी देवेगौडा दाम्पत्य लवकर कोरोनामुक्त व्हावेत, अशी प्रार्थना केली.
Previous Articleभाजप-तृणमूल यांच्या परस्परविरोधात तक्रारी
Next Article देशांतर्गत प्रवासात बेळगाव विमानतळ 15 व्या स्थानी
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.