नवी दिल्ली / प्रतिनिधी
10 डिसेंबर रोजी होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी प्रादेशिक पक्ष आणि भाजपमध्ये निवडणूकपूर्व युती असू शकते या चर्चेंना दुजोरा देत JD(S) सुप्रीमो एचडी देवेगौडा यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा केली. मंगळवारी दुपारी, मोदींनी गौडा यांचा हात धरून त्यांना बसण्याची विनंती केल्याचे फोटो व्हायरल झाले.
पत्रकारांशी बोलताना देवेगौडा म्हणाले की, त्यांनी आगामी निवडणुकांबाबत मोदींशी चर्चा केली, “मी मोदींना सुचवले की जेडी(एस) आणि भाजपच्या राज्यस्तरीय नेत्यांनी युती करण्याचा निर्णय घ्यावा. भाजपचे माजी मुख्यमंत्री बीएस येडियुरप्पा यांनी जाहीरपणे सांगितले होते की, प्रादेशिक पक्ष ज्या जागांवर निवडणूक लढवत नाहीत अशा जागांवर त्यांनी जेडीएसचा पाठिंबा मागितला होता. “येडियुरप्पा यांनीही या विषयावर लवकरच नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगितले. शेवटी, पक्ष सत्तेत असल्याने युतीबाबत निर्णय घेणे हे भाजपवर अवलंबून असून त्याबाबत पंतप्रधानांना कळवले आहे,”
गौडा यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खर्गे जेडी(एस) सोबत युती करण्याबद्दल “सहानुभूतीपूर्ण” असल्याचे निदर्शनास आणून दिले. “परंतु, काँग्रेस हायकमांडचा निर्णय गुलदस्त्यात आहे.” त्यामुळेच जेडीएसचे राज्य प्रवक्ते टी.ए.शरावना म्हणाले भाजप हायकमांड कोणता निर्णय घेईल यावर पक्षाचे धोरण ठरेल. JD(S) च्या सूत्रांनुसार, प्रादेशिक पक्ष ज्या जागांवर निवडणूक लढवत नाही अशा जागांवर भाजप उमेदवारांना पाठिंबा देण्यास तयार आहे. “जेडी(एस) भाजपचा दरवाजा ठोठावणार नाही. जर राष्ट्रीय पक्षाच्या नेतृत्वाने आमचा पाठिंबा घेण्याबाबत निर्णय घेतला तर आम्ही त्यासाठी तयार आहोत. पण भाजपला आधी तो निर्णय घ्यावा लागेल,” असे जेडी(एस) प्रवक्त्याने सांगितले.
भविष्यात भाजप-जेडी(एस) युती 2023 मध्ये कर्नाटक विधानसभा निवडणुकांना सामोरे जाऊ शकते.
चार महिन्यांपूर्वी बसवराज बोम्माई सरकारला अडचणींचा सामना करावा लागला होता त्यावेळी गौडा यांनी मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांना पाठिंबा दिला होता. जेडी(एस) च्या सूत्रांचे म्हणणे आहे की 2023 मध्ये त्यांच्या स्वत:च्या संभाव्य जागेला धक्का पोहोचणार नाही अशा मतदारसंघातच पक्ष भाजपला पाठिंबा देऊ शकतो. “2023 च्या निवडणुकीवरील परिणामांचा विचार करण्यासाठी जिल्हा पातळीवरील नेत्यांशी अनधिकृतपणे चर्चा केली गेली आहे आणि त्यामुळेच एमएलसी निवडणुकीत भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय घेता येईल” असे जेडी(एस) प्रवक्त्याने सांगितले. १० डिसेंबर रोजी, स्थानिक स्वराज्य संस्थांचे निवडून आलेले 25 सदस्य विधान परिषदेसाठी निवडूक लढवतील. या निवडणुकीत भाजपला बहुमतासह वरिष्ठ सभागृहावर नियंत्रण ठेवता येईल. भाजप आणि काँग्रेस 20 जागांवर लढत आहेत तर JD(S) फक्त 6 जागांवर आहे.