- घरातील देव्हारा ही देवाच्या प्रार्थनेची पवित्र जागा असते. म्हणूनच तिथे सकारात्मक वातावरण आणि शांतता असणे गरजेचे असते. देव्हाऱयाची जागा वास्तुशास्त्राला अनुसरून ठरवली तर घरामध्ये सुखसमृद्धी नांदते. घरात स्वतंत्र पूजेची खोली असणे अगदी चांगले असले, तरी मोठय़ा शहरांमध्ये जागेच्या उपलब्धतेअभावी ते नेहमीच शक्मय होत नाही.
- देव्हाऱयाची जागा हा घराचा अत्यंत शांत भाग असला तर तेथे दैवीशक्ती भरून राहते. ही अशी जागा आहे जेथे आपण परमेश्वराशी लीन होतो आणि त्याची शक्ती आपल्याला प्राप्त होते. देव्हारा ठेवायला स्वतंत्र खोली शक्मय नसेल, तर पूर्वेकडच्या भिंतीलगत इशान्य दिशेला एक चौथरा तयार करावा. घराच्या दक्षिणेला, आग्नेय किंवा नैऋत्य दिशेला देव्हारा ठेवणे टाळावे. वास्तूनुसार देव्हारा ठेवण्याची योग्य दिशा गुरू हा ईशान्येचा-ज्याला ईशान कोन असेही म्हणतात, स्वामी आहे, असे वास्तुशास्त्र आणि ज्योतिष सांगतात. ईशान म्हणजे ईश्वर किंवा देव. म्हणूनच ती दिशा देवाची म्हणजे गुरूची मानली जाते. यासाठी देव्हारा त्या दिशेला असणे चांगले. शिवाय पृथ्वीचा झोक याच दिशेला असतो आणि तिच्या प्रदक्षिणेचे सुरुवात तेथे होते. त्यामुळे ईशान्य कोपरा हा रेल्वे इंजिनासारखा सर्व घर आपल्या ताकदीने पुढे नेतो, देव्हारा घराच्या मध्यभागी ठेवणे (या जागेला ब्रह्मस्थान म्हणतात) पवित्र असते आणि त्यामुळे घरातल्या माणसांसाठी ऐश्वर्य आणि आरोग्य यांचा लाभ होतो.
- घरातील देव्हारा वास्तुशास्त्रानुसार कसा बांधवा याबद्दल काही नियम आहेत.
- घरात देव्हारा करताना सर्वात महत्त्वाचे म्हणजे देव्हारा थेट जमिनीवर ठेवू नका. त्याऐवजी तो थोडय़ा उंच चौथाऱयावर किंवा चौरंगावर ठेवावा. देव्हारा संगमरवरी किंवा लाकडी असावा, ऍक्रिलिक किंवा काचेचा देव्हारा टाळावा. देव्हाऱयात मूर्तींची गर्दी करू नये. एकाच देवतेच्या अनेक मूर्ती किंवा फोटो ठेऊ नयेत. देव्हाऱयात ठेवलेले फोटो अथवा मूर्ती चिरा गेलेल्या किंवा इतर नुकसान झालेल्या नसाव्यात, कारण ते अमंगल समजले जाते.
- देव्हारा जिथे असेल तिथे बसून पूजा करता आली पाहिजे. काही विशेष पूजांच्या वेळी कुटुंबातील सर्व सदस्य एकत्र जमून प्रार्थना करतात. देव्हाऱयात सतत सकारात्मक ऊर्जा खेळती राहावी. यासाठी ती जागा स्वच्छ आणि मोकळी ठेवावी. तिथे धूळ, कोळिष्टके जमू देऊ नये तसेच उपकरणांची गर्दीही करू नये. मुख्य म्हणजे देव्हारा आणि परिसर ही मनाला शांती देणारी जागा असते, याची जाणीव ठेवावी.
श्वेता जगन्नाथ म्हामल