प्रतिनिधी/ म्हापसा
येथील प्रसिद्ध दैवत श्री बोडगेश्वर देवाच्या 85 व्या जत्रोत्सवाची सांगता रविवारी करण्यात आली. जत्रोत्सव काळातील 10 दिवसात लाखो भक्तांनी श्रीचे दर्शन घेतले. यंदाचे वैशिष्ठय़ म्हणजे देवस्थान समितीने फेरीला जादा तीन दिवस मान्यता दिल्याने दुकानदारांनी समितीचे आभार व्यक्त केले आहेत.
यंदाचा उत्सव प्लास्टिकमुक्त करण्यात आली होती. काल शेवटच्या दिवशी आमदार जोशुआ डिसोझा यांनी देवस्थान समितीच्या विनंतीवरून जत्रोत्सवात भेट दिली. तसेच जत्रा संपल्यानंतर स्वतःच कचराही साफ करा अशी विनंती करणारी पत्रके दुकानदारांना वाटण्यात आली. यावेळी नगरसेवक संदीप फळारी, फ्रँकी कार्व्हालो, आदी उपस्थित होते.
या दहा दिवसात येथे करोडो रुपयांची उलाढाल झाली आहे. देवस्थानचे अध्यक्ष आनंद भाईडकर व समितीच्या देखरेखीखाली हा जत्रोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. म्हापसा पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता.