प्रतिनिधी / म्हापसा :
म्हापशातील प्रसिद्ध देवस्थान श्री देव बोडगेश्वराच्या 85 व्या जत्रोत्सवाला काल गुरुवारपासून उत्साहात प्रारंभ झाला. भाविकांनी देवदर्शन व खरेदीसाठी मोठय़ा संख्येने उपस्थिती लावली लावली. पुरोहित आपटे व श्याम गावकर यांनी गाऱहाणे घातल्यानंतर दु. 12 वा. जत्रोत्सवाला प्रारंभ झाला.
गोव्याच्या कानाकोपऱयातून आलेल्या असंख्य भाविकांनी देवदर्शनाला गर्दी केली होती. पालिकेने घोषित केल्याप्रमाणे यंदाचा जत्रोत्सव पूर्णपणे प्लास्टिकमुक्त होण्यात यशस्वी झाला आहे. यंदा रोटरॅक्ट क्लब व म्हापसा नगरपालिका व बोडगेश्वर समितीतर्फे देवस्थानला प्लास्टिक पिशव्यांचे वाटप करण्यात आले. दि. 15 रोजी जत्रोत्सवाची सांगता होईल. दर दिवशी सत्यनारायण पूजेचे आयोजन करण्यात आले आहे.
पालिकेची चोख व्यवस्था
भाविकांच्या गर्दीमुळे मंदिर परिसर, रस्त्यावर वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी पार्किंगची चोख व्यवस्था करण्यात आली आहे. म्हापसा पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर, वाहतूक निरीक्षक तुषार वेर्णेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथक तैनात करण्यात आले आहेत.
म्हापसा शहराच्या दक्षिण सिमेवर असलेले जागृत देवस्थान गोमंतकीयांचे श्रद्धास्थान आहे. देवस्थान समितीच्या मार्गदर्शनाखाली समिती सदस्य व भक्तगण जत्रोत्सव सुरळीत पार पडावा यासाठी झटत आहेत. जत्रोत्सवानिमित्त बोडगेश्वर मंदिर परिसरात फेरी लागलेली आहे. यात जायंटव्हिल, फिरते पाळणे व अन्य विविध अनेक विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांचे स्टॉलही लावण्यात आले आहेत. दैनंदिन जीवनासाठी आवश्यक असलेल्या विविध वस्तू जत्रोत्सवात उपलब्ध असतात. त्यामुळे देवदर्शनाबरोबरच खरेदीचा आनंद लुटण्यासाठी जत्रोत्सवात भाविक गर्दी करतात. श्री देव बोडगेश्वराचा 27 वा वर्धापनदिन सोहळा मोठय़ा उत्साहात साजरा करण्यात आला. गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आरोग्य मंत्री विश्वजीत राणे, कचरा व्यवस्थापन मंत्री मायकल लोबो, आमदार विनोद पालयेकर, आमदार जयेश साळगांवकर, विरोधी पक्ष नेते दिगंबर कामत, म्हापशाचे नगराध्यक्ष रायन ब्रागांझा, नगरेसवक संदीप फळारी, रोहन कवळेकर, सुधीर कांदोळकर, संजय मिशाळ, अखिल गोवा भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक, बार्देश तालुका भंडारी समाज अध्यक्ष सुधीर कांदोळकर, म्हापसा पोलीस उपअधीक्षक गजानन प्रभुदेसाई, निरीक्षक तुषार लोटलीकर, वाहतूक पोलीस निरीक्षक तुषार वेर्णेकर, यांच्यासह पाच हजार भाविकांनी देवदर्शन घेतले. देवस्थानचे अध्यक्ष आनंद भाईडकर यांनी सर्व मान्यवरांचे स्वागत केले.
सचिव अशोक गोवेकर, खजिनदार-पांडुरंग कोरगावकर, उपाध्यक्ष-दीपक म्हाडेश्री, मुखत्यार-राजेंद्र पेडणेकर, उपसचिव-सुशांत गांवकर, उपखजिनदार-शामसुंदर पेडणेकर, उपमुखत्यार-नंदकिशोर शिरगांवकर यावेळी उपस्थित होते.
देवस्थानचे सचिव अशोक गोवेकर यांनी दु. 12 वा. श्रींची पूजा केल्यावर आरती होऊन 85 व्या वार्षिक जत्रोत्सवाला प्रारंभ झाला. त्यानंतर देवदर्शन घेण्यासाठी भाविकांनी अलोट गर्दी केली. पहाटे पर्यंत ही गर्दी सुरू होती.