अमृतमहोत्सवी गोवा मुक्तिदिनानिमित्त सांताक्रूझ पंचायतीतर्फे आयोजन
प्रतिनिधी /पणजी
सांताक्रूझ पंचायतीतर्फे अमृतमहोत्सवी गोवा मुक्तिदिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या देशभक्तीपर समूह गीतगायन स्पर्धेत के.बी.हेडगेवार विद्यालयाने प्रथम क्रमांक पटकावला. के.बी.हेडगेवार विद्यालयातील समीक्षा वेळीप, सान्वी भट, सुमेधा काणकोणकर, अनन्या रायकर, युक्ता सावईकर, पौरवी अशांक देसाई यांनी सादर केलेल्या देशभक्तीपर गीताला प्रथम क्रमांक मिळाला. त्यांना तबला शिक्षक अभिजित एकवडे आणि हार्मोनियम शिक्षक राजकुमार गावस यांनी मार्गदर्शन केले. व संगीतसाथ दिली.
शिक्षिका अक्षता किनळेकर, राजषी गावडे यांनी त्यांना सहकार्य केले. के.बी.हेडगेवार विद्यालयाचे मुख्याध्यापक विलास सतरकर आणि व्यवस्थापक सुभाष देसाई यांनी प्रथम क्रमांक पारितोषिक प्राप्त मुलांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.