ऑनलाईन टीम / तरुण भारत
हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष महत्त्व आहे. भगवान शंकराची पूजा करणाऱ्यांसाठी महाशिवरात्री हा दिवस खास असतो. या महाशिवरात्रीनिमित्त पहाटेपासून भाविक भगवान शंकरांचे दर्शन घेण्यासाठी मंदिरात जात असतात. आजच्या दिवशी देशातील बहुतेक मंदिरात विशेष कार्यक्रमांचे आजच्या दिवशी विषेश कार्यक्रम आयोजित केले जातात.
याच पार्श्वभुमीवर आज देशातील बहुतेक मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत.गेले दोन वर्षे कोरोना संसर्गामूळे बंद असलेली मंदिरं यंदाच्या महाशिवरात्रीला भाविकांसाठी खुली करण्यात आहे. त्यामुळे भाविकांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. मंदिरांना केलेली आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांची सजावट यामुळे भगवान शिवाच्या मंदिरात चैत्यन्यपुर्ण वातावरण आहे. आजच्या दिवशी भाविकांकडून शिवमंदिरात शिवलिंगावर बेलपत्र आणि दूध-पाण्याचा अभिषेक केला जातो.
या निमित्ताने ठिकठिकाणी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत बाबुलनाथ मंदिर, नाशिकमध्ये त्र्यंबकेश्वरमध्ये तर कोकणात कुणकेश्वर येथील शिवमंदिरामध्ये महाशिवरात्री निमित्त खास कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.याबरोबरच मध्य प्रदेशातील उज्जैनच्या महाकालेश्वर मंदिरात भगवान शंकराची पूजा केली गेली. तर भारतातील बारा ज्योतिर्लिंगापैकीआठवे ज्योतिर्लिंग म्हणजेच औंढा नागनाथ येथे महाशिवरात्री निमित्त रात्री बारा वाजता नागनाथ प्रभूची पूजा पार पडली.यानंतर मंदिर भाविकांसाठी दर्शनासाठी खुले ही करण्यात आले आहे.