ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
देशातील लॉकडाऊनचे निर्बंध उठवल्यानंतर 50 टक्के क्षमतेने सुरू करण्यात आलेली सिनेमागृह उद्यापासून (दि.01) पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ट्विटद्वारे यासंदर्भात माहिती दिली आहे.
जावडेकर यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, देशात 1 फेब्रुवारीपासून सिनेमागृह 100% क्षमतेने चालवण्याची परवानगी देण्यात आली आहे. सिनेमागृहात कोविड 19 शी संबंधित सर्व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन केले जाईल, याची काळजी सिनेमागृह चालकांनी घ्यावी.सरकार अधिकाधिक ऑनलाईन तिकीट बुकिंगला प्रोत्साहन देत आहे. दोन्ही शोजच्या मध्ये थोडा वेळ असेल, जेणेकरून सिनेमागृहात गर्दी होणार नाही.