ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय पुरुष हॉकी संघाने इतिहासाची नोदं करत कांस्य पदकाची कमाई केली आहे. अटीतटीच्या लढाईत भारताने जर्मनीवर 5-4 ने मात करत कांस्य पदक आपल्या नावे केले. तब्बल 41 वर्षांनी भारतीय हॉकी संघाने ऑलिम्पिकमध्ये पदकाची कमाई केली. याआधी 1980 साली भारतीय संघाने मॉस्कोत शेवटचं पदक मिळवले होते.
या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय संघावर सध्या सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होतो आहे. दिग्गज भारतीय नेत्यांपासून ते क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांनी भारतीय संघाचं कौतुक करत त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
- ऐतिहासिक! यादगार दिवस…
या विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत संघाला शुभेच्छा दिल्या आहेत. पंतप्रधान मोदींसह अनेक दिग्गजांनी भारतीय पुरुष हॉकी संघावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. पंतप्रधान मोदींनी म्हटले आहे की, हा दिवस भारतीयांसाठी यादगार दिवस राहिल.
ते आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, ऐतिहासिक! हा असा ऐतिहासिक दिवस आहे जो सदैव लक्षात राहील. कांस्य पदक जिंकलेल्या भारतीय संघाला खूप शुभेच्छा. भारताला आपल्या संघाचा गर्व आहे. हा नवा भारत आहे. आत्मविश्वासानं भरलेला भारत आहे, असेही म्हटले आहे.
22.
3.
4.